आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
जमेदारी आमचा पिंड आहे,
भाषा आमची गुंडा आहे,
हाच माप दंड आहे,
सारे जन कोठे हि जावोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
जीवन आमचे धुंद आहे,
त्याला स्वाभिमानाचा गंध आहे,
दिलदारीचा सुगंध आहे,
याच धुंदीत आम्ही मस्त आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
शान शौकत आमचे अंग आहे,
गाणे बुजावाने आमचा रंग आहे,
खानदानी आमचा ढंग आहे,
मरे पर्यंत आम्ही जवान आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
मोडू पण वाकणार नाही,
प्राण गेला तरी नमणार नाही,
दिलेली साथ सोडणार नाही,
सारे लोक कुठे हि राहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
जिद्द व लहरीपणा, आम्चातून जाणार नाही,
सुंभ जाळला तरी पीळमात्र जाळणार नाही,
परंपरेचा अभिमान आम्ही कधीच सोडणार नाही,
सारे लोक कुणाची हि गावोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
भूतकाळ आह्मी कधी पहिला नाही,
भविष्याची फिकीर केली नाही,
वर्तमानकाळ भोगल्याशिवाय सोडला नाही,
ह्याच धुंदीत आह्मी चूर आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
आतीश्या आमचा धर्म आहे,
दयाशीलता आमचा मर्म आहे,
दुस-यासाठी झिजत राहणे हेच कर्म आहे,
याच नशेत आम्ही मस्त आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
लेख लिहिणे आम्हास जमत नाही,
चोपडी भाषणे आम्ही करत नाही,
नाजूक कविता आम्ही लिहित नाही,
कारण आम्ही स्वत:च एक काव्य आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.
देश धर्म देवसुद्धा,
ह्यावर आमची आतुर श्रद्धा,
ध्येय पुजू सदानकदा,
त्याचसाठी आम्ही समर्पित आहोत,
आम्ही देशपांडे आहोत- आम्ही देशपांडे आहोत.