Saturday, December 13, 2014

रूप पाहता लोचनी

रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
वचन ऐका कमलापती।
माझी रंकाची विनंती॥
कर जोडितो कथेकाळी।
आपण आसवे जवळी॥

No comments:

Post a Comment